पुसद तालुक्यातील रामनगर मोहा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर बाबू सिंग चव्हाण वय 35 असे मृताचे नाव आहे. आत्महत्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी किशोरच्या मृतदेह पाने बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला परंतु विहिरीमध्ये जवळपास 40 फूट पाणी असल्यामुळे अग्निशमन दलाला पावाचरण करण्यात आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास शहर पोलिसांमार्फत सुरू आहे.