छत्रपती संभाजीनगर: कुटुंबातील महिलांना घेऊन जाणाऱ्या कारचालक व दुचाकी वरील तरुणांमध्ये कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला.क्षणार्धात दोन्ही गटाचे टोळके जमा झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दंगल टळली. हा संपूर्ण प्रकार शहरातील हडको कॉर्नर येथे रविवारी रात्री बारा वाजता घडला.