संगमनेर महाविद्यालयात संविधान व सायबर सुरक्षा जनजागृती रॅली संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभाग आणि फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर एज्युकेशन फॉर सायबर सेक्युरिटी" या उपक्रमांतर्गत आज दुपारी महाविद्यालय ते बसस्थानक दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी सायबर जनजागृतीवर प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.