सातारा शहरातील मोती चौक येथील फुटपाथावर विवाहित महिलेचा पाठलाग करून, महिलेची इच्छा नसताना बोलण्यासाठी दोन दिवसापासून चैतन्य भोसले नावाचा व्यक्ती, या महिलेचा पाठलाग करत होता, या महिलेशी बोलण्यासाठी त्याने एका पाकिटा मध्ये कॅडबरी व स्वतःचा मोबाईल नंबर लिहून, त्यावर कॉल कर असे म्हणत पाठलाग केल्याप्रकरणी, सदर विवाहित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात, चैतन्य भोसले विरोधात तक्रार दिली, ही घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.