आज देशभरात सर्वत्र श्रीराम जयंती अर्थात रामनवमी उत्साहात साजरी केली जातेय.नीरा येथे देखील विठ्ठल नामदेव मंदिरात जयंती सोहळा उत्साहात पारपडला. दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.तर सायंकाळी सात वाजता नीरा ग्रामस्थांच्यावतीने श्रीराम मूर्तींची नीरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.