किराणा दुकानावर अवैधरित्या गॅस सिलेंडरची विक्री करणार्या 3 दुकानदारावर कारवाई करुन 33 हजार रुपये किंमतीचे 14 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती शुक्रवार दि.22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली. चंदनझिरा भागातील काही किराणा दुकानदार हे परवाना नसतांना बेकायदेशिररित्या अवैद्यरित्या गॅस सिलेंडरचा साठा करुन ते जास्त दराने विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक पवार यांना मिळाली.