कवठेमहांकाळ येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित दोस्ती दहीहंडी कार्यक्रमाच्या दरम्यान राजकीय रंग चढलेला प्रसंग घडला. या वेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ईश्वरपूरचे आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. याआधी जयंत पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत काही लोक दुसऱ्याच्या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतात, असे वक्तव्य केले होते. या टीकेला उत्तर देताना पडळकर यांनी पलटवार करत जयंत पाटील यांना थेट आव्हा