कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पंचमुखी महादेव मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला आहे,यावेळी कलशाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून श्री 108 केशव पुरी महाराज डोंगरगाव पूल आणि श्री 108 प.ब्र सद्गुरु महादेव तोटलिंग स्वामी मठ कळमनुरी यांच्या शुभहस्ते कलशाची स्थापना करण्यात आली आहे .त्यावेळी भाविकांसाठी श्रावण मास महाप्रसादाचा उंबराच्या डोळ्याच्या भाजीचा भाविकांनी आस्वाद घेतला आहे .याप्रसंगी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .