दि.3 सप्टेंबर रोजी दु.12 वाजेच्या दरम्यान कृषीउत्पन्न बाजार समिती येथे फिर्यादी विश्वनाथ चुटे हे बैल बाजार येथे बैल खरेदी करण्याकरिता आले होते व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील गेटजवळ मोटरसायकल एमएच 35 एएन9819 ठेवली होती.बैल बाजारात गेल्यानंतर ते 1 वाजेच्या दरम्यान ठेवलेल्या मोटरसायकलच्या जागी आले असता त्यांना मोटरसायकल दिसली नाही.कोणीतरी अज्ञात चोराने मोटरसायकल चोरून नेली.फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध दि.6 सप्टेंबर रोजी दु.1वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आले आहे.