गुप्त माहितीच्या आधारे वाडी पोलिसांनी मारुती नगर येथील गणेश डेरी येथे छापा मार कार्यवाही करून सुरू असलेला जुगार पकडला. घटनास्थळावरून डावावरील रोख रक्कम आठ मोबाईल व इतर साहित्य असा एकूण एक लाख 14 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विजय घाडगे,किशोर चरपे, कमलेश शरणागत,नरेंद्र झिंगरे, शुभम नेवलकर, एकनाथ डहाके,लकी पिसे मनोज पारल,दिलीप गुंडेकर, हरि चवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.