रात्रीच्या सुमारास अड्याळ पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी रात्रगस्त करीत असताना एका पान ठेल्याच्या मागे स्वतःचे अस्तित्व लपवून बसलेल्या २ युवकांना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वासेळा येथे घडली. या घटनेत अड्याळ पोलिसांनी आदेश रवींद्र चिंतनवार (२६) व उमेश रमेश जांभुळकर (३५) दोन्ही रा कोरंभी यांच्या विरोधात अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.