शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ८ ते २५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अकाऊटंटला ६३ लाख ९३ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी पुण्यातील दोघांना अटक केली आहे. त्यांचे मातोश्री पॅथोलॉजी लॅबोटरी नावाने बँकेत खाते आहे. या खात्यात त्यांनी आतापर्यंत १ कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचे व्यवहार झाले असून या बँक खात्याविरुद्ध विविध राज्यातील फसवणुकीच्या १० तक्रारी मिळाल्या आहेत.