रात्रीच्या सुमारास लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी रात्र गस्त करीत असताना त्यांना एका सार्वजनिक ठिकाणी एक 24 वर्षीय युवक अंमली पदार्थांचे सेवक करताना आढळून आला. गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून त्याचे विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ही घटना 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडे 12 वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील सार्वजनिक ठिकाणी घडली. या घटनेत आरोपी वेदांत पितांबर बागडे (24) यांच्या विरोधात लाखनी पोलिसात गुन्हा दाखल केला.