करमाळा शहरातील एका महाविद्यालयातील प्राचार्याने महिला कर्मचाऱ्याच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महाविद्यालयातील ४७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आरोपी यांनी त्यांच्या कक्षात बोलावून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटंल आहे.