मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटून फरार झालेल्या टोळीतील पाच दरोडेखोरांना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. सलग दहा दिवस चाललेल्या शोधमोहिमेत मेहकर पोलिसांची तीन व बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी पाच पथके गुंतली होती. अखेर या पथकांना यश मिळाले असून लुटलेले अर्ध्याधिक सोनेही पोलिसांनी जप्त केले आहे.या टोळीत सहभागी असलेल्या आरोपींपैकी तीन जण खासगी वाहनचालक तर दोघे सराफांच्या दुकानात काम करणारे असल्याचे समजते.