नागपूर शहरात ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या, ज्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.विशेष नमाज पठण करण्यात आलं. यानंतर, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.शहराच्या विविध भागांतून निघालेल्या मिरवणुकांनी नागपूरच्या रस्त्यांना एक वेगळाच रंग चढला होता. या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले नागरिक ‘अल्लाहू अकबर’चा जयघोष करत होते.