धुळे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी बैलपोळा उत्साहात साजरा झाला. आर्णी गावात शेतकऱ्यांनी सर्जा-राजाला रंगीत सजावट करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. वर्षभर शेतात साथ देणाऱ्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मात्र या आनंदसोबत शेतकऱ्यांनी व्यथा मांडत नवीन कृषिमंत्र्यांनी तातडीने कर्जमाफी जाहीर करून अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी भावनिक मागणी केली.