गडचिरोली, जिल्ह्यातील तरुणांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गडचिरोली येथे ‘ट्रॅक्टर टेक’ हा ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरील व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी व महिंद्रा अँड महिद्रा यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला.