नंदुरबार शहरातील जगतापवाडी येथे राहणारे निरंजन मनोहर मराठे यांची घरासमोर उभी असलेली 65 हजार रुपये किमतीची बुलेट क्रमांक एम एच 39 एक्स 4107 ही अज्ञात इसमाने चोरून नेली आहे याबाबत दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी निरंजन मनोहर मराठे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.