पेट्रोल भरण्यास पेट्रोलपंपावर वळत असलेल्या कारला टँकरने मागून धडक मारल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. ही घटना ता. 13 शनिवारला सकाळी 10 वाजताचे सुमारास गोंदापुर शिवारात भारत पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी हितेश संजय पटले वय 34 रा. बोरगाव मेघे यांच्या फिर्यादीवरून सकाळी 11.30 वाजत टँकर चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.