Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट 9:00 वाजता संभाजीनगर जिल्ह्याला हादरवून टाकणारा खून संभाजी कॉलनीमध्ये घडला. या प्रकरणात राजकीय पाठबळ असल्याचा आरोप सातत्याने होत होता. पाडसवाहन कुटुंबाच्या जबाबानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह मंडळाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर गुन्ह्यात नाव येताच आरोपीची बहीण घटनास्थळावरून पसार झाली आहे. गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा उभाटाचा शाखाप्रमुख अरुण विष्णू गव्हाड, मंगेश गजानन वाघ अशी आरोपींची नावं आहेत.