आज गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नवनियुक्त समाज कल्याण अधिकारी वर्ग-२ यांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ देखील देखील उपस्थितीत होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, वंचित घटकांच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हे अधिकारी नक्कीच मोलाची कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.