संगमनेर विकासावरून आरोप-प्रत्यारोप : "पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण प्रकल्प थोरातांच्या प्रयत्नातूनच सुरू" – सोमेश्वर दिवटे संगमनेर | महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना आज नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी प्रत्युत्तर दिले. दुपारी तीन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की संगमनेर शहराचा पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातूनच सुरू झाला होता.