स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ने गुरुवार दि. 28 ऑगस्टला रात्री 9 वाजताच्या दरम्यान केलेल्या कारवाईत रामटेक पो. स्टे. अंतर्गत येणाऱ्या भोंदेवाडा शिवार सूर नदीचे काठावर रोडवर आरोपी प्रवीण कृष्णा शरणांगत वय 32 वर्ष रा. डोंगरी ता. रामटेक याला माऊजर मॅगझीन सह ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. ही माहिती शुक्रवार दि. 29 ऑगस्टला सायं.सात वाजताच्या दरम्यान रामटेक पोलिसांनी प्रेस नोट द्वारे दिली. या गुन्ह्यात 2 आरोपींना अटक केली.