बीडमधील गोविंद बर्गे या उपसरपंचाने पारगाव येथील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमसंबंधातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल यांनी ९ रोजी सायं ६ वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली. गोविंद यांनी पूजावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता. यात सोन्याचे दागिने आणि सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईलही तिला घेऊन दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातून हा प्रकार घडला आहे.