मुंब्रा येथील गणपती मंडळांनी ठाणे महापालिकेचा जाहीर निषेध केला आहे. काल विसर्जनाच्या दिवशी शंकर मंदिर परिसरातील विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन न करू देता कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाग पाडले. परंपरेनुसार दरवर्षी विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन होत. मात्र ठाणे महापालिकेने अचानक विसर्जन घाट बंद केला. त्यामुळे अनेक गणपती मंडळांनी ठाणे महापालिकेचा जाहीर निषेध केला आहे.