जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खताच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आवश्यकतेनुसार युरियाचा पुरवठा होत नाही. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना कमी प्रमाणात युरिया दिला जातो आणि तोही इतर महागड्या खतांसहच उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी बचत गटांच्या माध्यमातून युरिया निर्मिती व वितरण करण्याची मागणी केली आहे.