हिंगोली जागतिक बँक अर्थसहायित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत टीएसए (प्लॅडियम) संस्थेमार्फत समुदाय आधारित संस्थेच्या संचालकांची जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा आज येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आत्मा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲक्सेस टू फायनान्स प्रोक्रूमेंट असोसिएट आरआययूचे हनुमंत आरदवाड, ॲग्ररआययूचे सचिन कच्छवे, जिल्हा समन्वयक वैभव तांबडे, आदी उपस्थित होते.