सार्वजनिक दसरा महोत्सव-2025 साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक व कृषी प्रदर्शनीमधील व बाहेरील नकाशाप्रमाणे नियोजित तयार केलेले गाळे (दुकाने) महोत्सव दरम्यान (कालावधी 14 दिवस) विविध दुकाने थाटण्याच्या दृष्टिकोनातून भाडे तत्वावर देण्यासाठी जाहीर बोली बोलून हर्राशी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य तथा गटविकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली बोली बोलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रामलीला मैदान पडणार आहे.