कोरची तालुक्यातील कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज दि.३० आगस्ट शनिवार रोजी सकाळी १० वाजता भेट देऊन रूग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रात उपचारा करीता दाखल रुग्णांशी संवाद साधत त्यांचा प्रकृतीची विचारपूस केली व त्यांचावर करण्यात येत असलेल्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली.