जळगाव शहरातील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यांच्या वतीने विद्यार्थिनींसाठी भव्य तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.