जालन्याहून देवखेडकडे परत येत असताना ३१ जुलै रोजी रात्री सिंदखेड राजा शिवारात रोहीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण सतीश गजानन राठोड वय २५ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले दिगंबर आढाव वय ३० वर्ष हे गंभीर जखमी झाले .अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार आशिष इंगळे व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. पोलिसांनी पंचनामा करून सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.