जांबुत गावात घरकुलांसाठी साठवलेली वाळू तस्करांनी लंपास; प्रशासन मौनात संगमनेर तालुका – साकुर पठार परिसरातील जांबुत गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रातून घरकुलांसाठी काढून ठेवलेला वाळू साठा तस्करांनी चक्क लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराबाबत जांबुत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी महसूल प्रशासनावर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.