नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत 38 प्रभागाच्या रचनेबाबत 115 आक्षेप दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस सोबत भाजपा माझी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी यामध्ये आक्षेप नोंदविला आहे. या आक्षेपावर आज सुनावणी पार पडली त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे. काहींनी सीमांकनावर तर काहींनी विधानसभा मतदारसंघाच्या सीमांचा विचार करण्यात आला नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे.