चिखली शहरात १८ ऑगस्ट रोजी भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, जीव धोक्यात घालून खरी परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवणारे पत्रकार छोटू कांबळे यांचा 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर,आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडघान पाटील आदी उपस्थित होते.