तालुक्यात अवैध सावकारीमुळे होणारा त्रास डोईजड झाल्यानंतर अखेर शिरपूर शहर पोलिस व सहकार विभागाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. तालुक्यातील पाच अवैध सावकारी करणाऱ्याना मुद्दलापेक्षा जास्त पैसे देऊनही वारंवार पैशांची मागणी होत असल्याने पत्नीसह आत्महत्येच्या निर्णय घेतल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली.तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस व सहकार विभागाने धडक कारवाई केली.