सातारा जिल्ह्यातल पुसेगाव ते फलटण जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ओमिनी कारने दुचाकी चालकास धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली असून त्याचा व्हिडीओ शनिवारी दुपारी सातारा जिल्ह्यात व्हायरल झालेला आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत झालेली नव्हती.