भारतीय संविधानाने प्रत्येक विद्यार्थ्याना शिक्षणाचा मौलिक अधिकार दिलेला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मौलिक अधिकारापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही कारण तो त्यांचा मौलिक अधिकार आहे. असे असतांना सुध्दा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि एस. टी. आगार व्यवस्थापक यांच्या हलगर्जीपणामुळे पुसद तालुक्यातील शिवणी-होरकड-मोप गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. असा आरोप करण्यात येत आहे.