जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील हॉटेल जान्हवीसमोर हॉटेलच्या बिलावरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या निलेश दिलीप पाटील (वय ४० रा. कुसुंबा ता.जळगाव) या तरूणाला अनोळखी ४ ते ५ जणांनी काचेची बॉटल आणि स्टीलच्या जगने बेदम मारहाण केली. या घटनेत निलेश पाटील गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.