जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घानेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या संवर्धनासह विकास कामाच्या नियोजनासाठी खा. डॉ. कल्याण काळे हे सरसावले असून त्यांनी जालना जिल्ह्यातील जलाशय, नद्या यासह विकास कामाच्या अनुषंगाने प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी जालना जिल्ह्यातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि विविध सामाजिक संघटनांची शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता बैठक घेतली. यावेळी उपस्थितांकडून विविध संकल्पना आणि सुचना जाणून घेतल्या. खा. डॉ. कल्याण काळे यांनी तीन तास सूचना ऐकून घेतल्या.