उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील नाल्यात वाहून गेलेल्या 45 वर्षीय इसम तब्बल 24 तास उलटूनही अद्याप बेपत्ता आहे. सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत त्याच्या कोणताही थांगपत्ता लागला नाही. अंगावर कपडे नसल्याने तो थेट नाल्याच्या प्रवाहात अडकला नसावा असा अंदाज व्यक्त करत तो थेट पैनगंगा नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.