12 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे तहसील अंतर्गत येणाऱ्या गांधी पुतळा चौक येथे विजयकुमार गुप्ता यांचे गुप्ताजी कृष्णाजी नावाचे हार्डवेअर व प्लायवूड विक्रीचे दुकान आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या दुकानात घुसून ड्रॉवरमध्ये ठेवलेली दीड लाख रुपये रोख रक्कम व जुना मोबाईल चोरून नेला. या आरोपीने ग्रीलच्या खिडकीतून आत मध्ये प्रवेश करून चोरी केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून या आधारे तहसील पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.