नातेवाईकांमध्ये जुन्या वैमानश्यातून झालेल्या वादात राड व सरोत्याने हल्ला करण्यात आल्याने चौघे जखमी झाल्याची घटना रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत अंगूर बगीचा परिसरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली पहिल्या घटनेत महेश नागपुरे हा तरुण आपल्या मित्रांसोबत मारबत सजवत असताना आरोपी अनुज मस्करे यांनी घरातून स्टीलचा राॅड आणून महेशच्या हातावर मारला दरम्यान महेशचा मित्र रोहित राजू प्रधान मध्ये पडताच आरोपीच्या सोबतीने घरून सरोता आणून त्याच्या कपाळावर मारून गंभीर दुखापत केली