मोताळा तालुक्यातील अंत्री एका ३२ वर्षीय विवाहीत युवकाचा मृतदेह विहीरीत आढळला. सदर युवक मागील १४ दिवसांपासून घरुन निघून गेलेला होता. त्याचा मृतदेह ५ सप्टेंबर रोजी अंत्री शिवारातील निवृत्ती जवरे यांच्या विहीरीत आढळला आहे.मृतकाचे नाव श्रीकृष्ण दयाराम कोळसे असे आहे.याप्रकरणी मृतकाचे वडील दयाराम देविदास कोळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.