आर्णी तालुक्यातील माळेगाव ते सावळी सदोबा या मार्गावरील रस्त्यावर,सावळी सदोबा गावाजवळ मागील चार महिन्यांपासून गुडघाभर गलिच्छ पाणी साचलेले आहे.या पाण्यातून दररोज दातोडी,माळेगाव,ईचोरा,दहेली,सुभाषनगर,निळेगावसह परिसरातील बहुतांश गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या समस्येमुळे शाळकरी मुलांचे शिक्षण अडथळ्यात आले असून,वृद्धांना दवाखान्यात नेणे अवघड झाले आहे. गर्भवती महिलांना पाण्यातून उचलून न्यावे लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.साहेब,आमच्या मुलांना शाळेत जाता येत ना