गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मॉर्निग वॉककरता हार्मोनी पार्क विकासनगर येथे महिला गेल्या होत्या. त्यातील एका महिलेला तीन चोरट्यांनी गाठून कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ गुरुवारी दिवसभर व्हायरल होत आहे. ही घटना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याची नोंद दुपारी ३ वाजेपर्यंत झाली नव्हती.