सातारा शहरातील राधिका रस्त्यावरील गार्डन सिटी येथे, डी.पी. जवळ माकडांचा कळप आला असता, यातील एका माकडाला ड. पी.चा शॉक लागला, ही गोष्ट लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख(झुलेवाला) यांनी घटनास्थळी धाव घेऊन बांबूच्या साह्याने माकडाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी जाळ निघत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते, अखेर बांबूच्या साहाय्याने माकडाला बाजूला केले मात्र माकड मृत्युमुखी पडल्यामुळे सलीम शेख यांची धडपड निष्फळ ठरली यानंतर,मृत माकडाला वन वन विभागाच्या कार्यालयात देण्यात आले.