काटोल विधानसभा क्षेत्रात झालेल्या सतत मुसळधार पावसामुळे झाडावरील फळांची झपाट्याने गळ झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील संत्रा व मोसंबी फळ पिकांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ सर्वेक्षण करून अधिकृत पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे.