येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये डॉल्बी व लेझर याच्यावर बंदी आणावी, या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वाजता पंचमुखी गणेश मंदिरासमोर जेष्ठ नागरिकांकडून महाआरती करून, गणेशोत्सव काळात केवळ पारंपारिक वाद्य वाजवावे, अशी मागणी करण्यात आली, डॉल्बी मुळे ज्येष्ठ नागरिकांसह, लहान मुलांना त्रास होत आहे, कर्णबधीर सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, डॉल्बीमुळे गणपती प्रसन्न होतो का असा प्रश्न देखील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला.