यवतमाळ जिल्ह्याचा नोमान अहेमद अतीक अहेमद या विद्यार्थ्याने शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI), यवतमाळ येथे इलेक्ट्रिशियन (NSQF) या ट्रेडमध्ये शिक्षण घेणाऱ्या नोमान ने जुलै 2025 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवून शतप्रतिशत निकालाची नोंद केली आहे.